नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार एचआयव्ही/एड्स हा जगातील सर्वात मोठा धोका आहे. यामुळे जवळजवळ ३५ दशलक्ष लोकं मारले गेले असून ३७ दशलक्षपेक्षा जास्त लोकांवर याचा परिणाम झाला आहे.
हा रोग रोगप्रतिकारक शक्तीला इतका कमजोर बनवतो की, कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा सामना करण्यास असमर्थ होतो आणि ती व्यक्ती वेगवेगळ्या आजारांचा शिकार होत जाते. महिला आणि लहान मुलांमध्ये याचे लक्षण वेगळे-वेगळे असू शकते.
हा आजार असुरक्षित लैंगिंक संबंध, खराब रक्त आणि वापरलेल्या सिरिंजमुळे पसरतो. एचआयव्हीमध्ये सुरुवातीला याचा तपास लागत नाही. काही प्रकरणात लक्षात येताच टेस्ट केल्यामुळे थोडी मदत मिळू शकते. जर तुम्ही खूप वेळेपासून खालील लक्षणे आढळत असतील, तर तुम्हाला एचआयव्ही टेस्ट केली पाहिजे.
१) ताप येणे ही सामान्य गोष्ट असून तो एक-दोन दिवसात उतरतो. पण हा आजार तुम्हाला खूप काळ यतासच राहिला तर तुम्हाला एचआयव्ही असू शकतो. कारण ते एक एचआयव्हीचे लक्षण आहे. त्यामुळे खूप काळ ताप राहिला तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
२) एचआयव्हीचे विषाणू शरीराच्या कार्यक्षमतेवर खूप प्रभावी ठरतात. याच कारणामुळे लोकं अनेकदा थकून जातात. कोणतेही काम सुरु करायचंय अगोदरच थकवा जाणवतो. असे असेल तर सावधान व्हा.
३) एचआयव्ही पीडित व्यक्तीच्या शरीराच्या मांसपेशी जखडून जातात. त्याला नेहमी अस्वस्थ वाटते. जर तुम्हाला पण अशी समस्या सतावत असेल तर उशीर न करता डॉक्तरांकडे जा.
४) एचआयव्ही असलेल्या व्यक्तीच्या शरीरात नेहमी रोग प्रतिकारक क्षमता प्रभाव पाडत असते. याच कारणामुळे संक्रमित व्यक्तीला नेहमी डोकेदुखी आणि घास खवखवण्याची समस्या होते.
५) त्वचा आपल्या आरोग्याबद्दल काहीही सांगू शकते, असे मानतात. एचआयव्ही संक्रमण झाल्यावर त्वचा त्याबद्दल चेतावणी देते. तसेच त्वचेवर खाज आणि डागही येतात.
६) एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचे वजन अचानक कमी होते. चांगल्या डाएट प्लॅननंतरही तुमचे वजन कमी होत असेल तर सावध व्हा.
७) नेहमी घशात कोरडेपणा जाणवत असेल तर एचआयव्हीचे लक्षण दर्शवते.
८) एचआयव्ही संक्रमित व्यक्ती रात्र कुशी बदलण्यात घालवतात. त्यांना गुदरमल्यासारखे होते आणि अस्वस्थपणामुळे झोपही त्यांच्यापासून लांब होते.
९) तुमचे नखही तुम्ही एचआयव्हीचे शिकार असल्याचे सांगते. त्यांच्या नखांवर पिवळेपण आलेले दिसते.
१०) एका आजारी शरीराची सर्वात मोठी ओळख असते ती त्याची एकाग्रतेत कमी. माणसाला कितीही वाटले तरी तो आपल्या कामात किंवा अभ्यासात पूर्णपणे लक्ष घालता येत नाही.