नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक पुन्हा एकदा सलग तीन दिवस बंद राहणार असून तुम्हाला आजच पैशांची व्यवस्था करावी लागेल, नाहीतर तीन दिवस तुम्हाला अडचण येऊ शकते. २१ फेब्रुवारीपासून २३ फेब्रुवारीपर्यंत देशात बँका बंद राहणार आहेत. उद्या शिवरात्रीनिमित्त सुट्टी असून बँकांचे काम बंद राहणार आहे. तर २२ फेब्रुवारीला चौथा शनिवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीला रविवार असल्याने सुट्टी आहे. बँक बंद असल्यामुळे चेक क्लियरन्स, एनएफटी, आरटीजीएस इत्यादी कामे बंद राहतील. आता बँक २४ फेब्रुवारीलाच चालू होतील.
याअगोदरही तीन दिवस बँका बंद
याअगोदर ३१जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत बँका बंद होत्या. बँक संघटनांनी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीपर्यंत देशव्यापी संप करण्याचे आव्हान दिले होते. तर २ फेब्रुवारीला रविवार असल्याने बँकांना सुट्टी होती.
मार्चमध्ये सलग ५ दिवस राहू शकतात बँका बंद
पुढच्या महिन्यात सलग पाच दिवस बँका बंद साहू शकतात. सार्वजनिक क्षेत्रातिला बँक कर्मचारी ११ ते १३ मार्चपर्यंत तीन दिवस संपावर जाऊ शकतात. जर ११-१३ मार्चपर्यंत बँका बंद राहिल्या तर बँका सलग पाच दिवस बंद राहू शकतात. यामुळेच तीन दिवस संपानंतर १४ मार्चला महिन्याचा दुसरा शनिवार असून १५ मार्चला रविवार आहे. त्यामळे जर संप झाला तर बँकांचे तीन दिवस काम बंद राहू शकते.
मार्चमध्ये एकूण १६ दिवस बँका राहू शकतात बंद
आरबीआयनुसार या महिन्यात बँकांना ६ सुट्ट्या आहेत. याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार मिळून एकूण आठ दिवस बँका बंद राहतील. तर दुसरीकडे पाच रविवारला जोडले तर मार्चमध्ये एकूण १३ दिवस बँका बंद राहतील. जर संप झाला तर एकूण १६ दिवस बँका बंद राहतील.