दरम्यान नव्या वर्षात १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीप विवाहबद्ध होणार आहेत. मानसीने सांगितले की, पुण्यात १९ जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. १८ जानेवारीला मेहेंदी आणि संगीत सोहळा होईल. लग्नाच्याच दिवशी १९ जानेवारीलाच हळदीचा कार्यक्रम होईल” असे तिने सांगितले.
दोन्ही कुटुंबांनी परस्परसहमतीने छोटा आणि आनंददायी विवाहसोहळा करण्याचे ठरवले आहे त्यामुळे आम्ही खूप जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला लग्नासाठी आमंत्रित केले आहे. असे मानसीने सांगितले. मानसी नाईक आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे ओळखली जाते. तिची ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे.