नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Video viral | कोरोना महामारीमुळे मुलांचे शिक्षण आणि मोठ्यांचे ऑफिसचे काम घरातूनच ऑनलाइन सुरू आहे. मागील काही दिवसात ऑनालइन क्लास (online class) आणि मीटिंगचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, जे पाहून लोक हसत आहेत. सध्या पुन्हा असाच एक व्हिडिओ वायरल (Video viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा समजू शकते की ऑनलाइन अभ्यास (Online study) मुले आणि टीचर कशाप्रकारे करत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फेसबुकवर जो व्हिडिओ वायरल होत आहे, त्यामध्ये ऑनलाइन क्लासदरम्यान एक मुलगी आपल्या घरातील कुणाला तरी सांगत आहे की तिची सोशल स्डडीजची मॅम किती नटून-थटून आली आहे. मुलगी मॅडमच्या काजळापासून हायलायटर लावण्यासंबंधी सर्वकाही सांगत आहे की मॅडमने (Madam makeup) कोण-कोणता मेकअप केला आहे.
सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले आहे की ही पहा ऑनलाइन क्लासची मजा. तर दुसर्या यूजरने म्हटले आहे याला म्हणतात मॅडमची खुलेआम मस्करी करणे.
सोशल मीडियावर वायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सर्व मले ऑनलाइन क्लाससाठी एकदम
तयार आहेत. या दरम्यान क्लासमधील एक मुलगी म्हणते, सोशल स्टडीजची मॅम किती नटून-थटून
आली आहे. लिपस्टिक लावली आहे, कानातले घातले आहेत, हायलायटर लावले आहे, काजळसुद्धा
लावलेय, गोरी सुद्धा दिसत आहे. या व्हिडिओवरून असे वाटते की ही मुलगी आपला माईक बंद
करायला विसरली असावी.
हा व्हिडिओ फेसबुक यूजर ‘मंटू तिवारी’ने 14 जुलैजर शेयर केला होता. त्यांनी व्हिडिओला कॅपशन दिले आहे – हा आहे ऑनलाइन अभ्यास. आतापर्यंत या क्लिपला हजारो लाईक्स आणि शेयर मिळाले आहेत.
Web Title : video viral student seen talking about madam makeup in online class video goes viral
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Crime | अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या
Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा नाहीच ! पुण्यात सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहणार