मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – T-Series MD Bhushan Kumar |टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर (T- Series MD Bhushan Kumar) बलात्काराचा आरोप झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार (T- Series MD Bhushan Kumar) यांच्याविरोधात मुंबई(mumbai)त तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एका 30 वर्षीय तरुणीने दिली असून भूषण कुमार यांनी काम मिळवून देण्याच्या आमिषाने बलात्कार (Rape) केल्याचा आरोप केला आहे. भूषण कुमार हे प्रसिद्ध गीतकार गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांचे चिरंजीव आहेत.
तरुणीचे भूषण कुमार यांच्यावरील आरोप
प्रसिद्ध गीतकार गुलशन कुमार आणि टी-सिरीजचे एमडी भूषण कुमार यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीत तरुणीने आरोप लावला आहे की, त्याने टी सिरीजच्या एका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून बलात्कार केला. पीडित तरुणीने भूषण कुमार विरोधात तक्रार दाखल केली आहे. भूषण कुमार याने काम देण्याच्या आमिषाने 2017 ते 2020 पर्यंत अत्याचार केल्याचा आरोप (Allegations) तरुणीने केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पीडित तरुणीने आरोप केला की, तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. तसेच पीडित तरुणीने आरोपी करताना असेही म्हटले आहे की, आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धकमी तिला दिली होती. मुंबईतील अंधेरी येथील डीएन पोलीस ठाण्यात (DN police station) भूषण कुमार विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
web title : T-Series MD Bhushan Kumar | Bhushan Kumar of T-series accused of rape, 30-year-old girl lodges complaint.
नटून-थटून ऑनलाइन क्लास घेत होती टीचर, मुलीने सर्वांसमोर केले असे वर्णन; पहा Viral Video
Corona Lockdown | विरारमध्ये हॉटेल व्यावसायिकाची आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या