बहुजननामा ऑनलाइन टीम – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं. अखेर याचा निकाल समोर आला आहे. यात भारतीय वंशाच्या चेहऱ्यांची चांगलीच चर्चा होताना दिसली. इतकंच नाही तर या व्यक्तींना चांगलं यशही मिळालं.(Shatrughan Sinha) यातील एक नाव असं आहे ज्यांनी खूप लक्ष वेधलं ते म्हणजे कमला हॅरिस (Kamala Harris).
कमला हॅरिस यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाली आहे. एका बॉलिवूड स्टारचे त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी याबाबत माहिती दिली आहे. हॅरिस यांच्याशी असणारं अनोखं नातं त्यांनी सांगितलं आहे.
niece, like daughter, Preeta Sinha d/o my elder brother Dr.Lakhan Sinha who along with her young team has been very closely associated with the most deserving Kamala Harris, favourite of India/Indians being deeply involved in the USA Presidential Election, supporting,
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 8, 2020
सिन्हा यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. सिन्हा यांच्या मोठ्या भावाची मुलगी प्रीता (preeta) ही अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या जवळची आहे, असं सांगत त्यांनी तिच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
promoting & encouraging our own Kamala & her people for this outstanding mega win. Our daughter, Preeta too deserves Kudos! Well done! God Bless! pic.twitter.com/MY4FSLl3Rv
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 8, 2020
आपली पुतणी या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाली होती असं म्हणत त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर त्यांचं हे अनोख कनेक्शन पाहून चाहेतही अवाक् झाले. नेटकऱ्यांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली आहे.