चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – Accident News | पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबीयांवर काळानं घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली. उमरी फाट्याजवळ झालेल्या कार अपघातात (Accident News) मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर चंद्रपूर (Chandrapur) येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी संध्याकाळी ८ वाजता घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सायत्रा मोतीराम मेश्राम (वय ६५), मोतीराम भिकारी मेश्राम ( वय ७०), कमल उत्तम चूनारकर (वय ५०, सर्व रा. खापरी) अशी मृतांची नावे आहेत तर उत्तम चुनारकर (वय ४५, रा. चंद्रपूर) आणि अंकित राजू मेश्राम (वय १०, रा. खापरी) हे गंभीर जखमी (Accident News) झाले आहेत. रविवारी सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी मेश्राम कुटूंबीय आणि चुनारकर कारनं निघाले होते. उमरी फाट्याजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. त्यामध्ये मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Web Title : Accident News | three people died in chandrapur accident
Pune Crime | पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ‘पॉपी स्ट्रॉ’ ड्रग्ससह तिघांना अटक
Gold Price Today | सोन्यात किरकोळ तेजी, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे नवीन दर
Maharashtra Temperature | राज्यात रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता, तापमानात घट
Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे