पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 38 नवीन रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 88 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover) केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने थोडासा दिला मिळाला होता.
मात्र, कोरोना व्हायरसचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (omicron variant) एक रुग्ण आढळून आल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 426 संशयित रुग्णांची (Pune Corona) तपासणी केली असून यामध्ये 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यात आजपर्यंत 37 लाख 17 हजार 484 जणांची प्रयोगशाळा तपासणी (Laboratory Test) करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 7 हजार 174 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 278 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरामध्ये सध्या 797 अॅक्टिव्ह रुग्ण (active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
यामध्ये 84 रुग्ण गंभीर आहेत. तर 54 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात पुणे शहरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून ते शहाबाहेरील आहेत. शहरात आजर्पंयत 9 हजार 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आधिच्या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title :- Pune Corona | Discharge of 88 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics
Maharashtra Temperature | राज्यात रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता, तापमानात घट
Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे