पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या (Pune Water Supply) लष्कर जलकेंद्र (lashkar water station) व वडगाव जलकेंद्र (Vadgaon water station) अखत्यारीतील रामटेकडी टाकीवरील विद्युत, पंपींग आणि स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवारी (दि.09) रोजी पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.
तसेच शुक्रवारी (दि.10) शहरात सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी कळवले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद
वडगाव जलकेंद्र परिसर – सिंहगड रोड वरील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.
रामटेकडी टाकीवरील परिसर – हडपसर, काळेपडळ, महंमदवाडी, सय्यदनगर, गोंधळेनगर, बी.टी. कवडे रोड, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी.
Web Title :- Pune Water Supply | Water supply to some parts of Pune city will be cut off on Thursday.