सिल्लोड : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेत नुकतेच प्रवेश करणारे अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदार संघातून शिवसेनेची अब्रू राखली आहे. अब्दुल सत्तार यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोडकर मोठ्या मताधिक्यांनी मागे टाकले. मागील निवडणूकीत काँग्रेसकडून विजयी झालेले अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एका विजय मिळवला आहे. फरक एवढाच आहे की त्यांनी हा विजय शिवसेनेकडून मिळवला आहे. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस च्या अब्दुल सत्तार यांनी 96 हजार 038 एवढी मते मिळवत विजय मिळवला होता. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजप चे सुरेश बनकर होते. त्यांना 82 हजार 117 मते मिळाली. आणि त्यांचा 13 हजार 921 मतांनी पराभव झाला.
Visit : bahujannama.com