नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या संसर्गावर उपचार करण्यासाठी अनेक देशांत वेगवेगळे संशोधन केले जात आहे, जेणेकरून त्यावरील औषध तयार करून रूग्णांना उपचारांमध्ये मदत होईल. यादरम्यान भारत ग्लेनमार्क फार्मास्युटिकलद्वारे सांगण्यात आले आहे की, ही तिसर्या टप्प्यातील चाचणी भारतात केली जात आहे. या तिसऱ्या टप्यात रुग्णांवर अँटीवायरल औषध फेव्हीपीरावीर आणि युमिफिरोविर यांचे मिश्रण वापरले जाईल. संशोधनात म्हंटले आहे की, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या 158 रूग्णालयात ही चाचणी केली जाईल.
परवानगी मिळालेली पहिली कंपनी
ग्लेनमार्क ही पहिली औषध कंपनी आहे, जिला डीजीसीआयने देशात औषध चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. ग्लेनमार्कचे म्हणणे आहे की, त्यांना चाचणी परवानगी मिळाली आहे. मुंबई येथील कंपनी दोन्ही औषधांच्या मिश्रणाची चाचणी रूग्णांवर करेल. या अँटीवायरल औषधाचे काम करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. कंपनीने मंगळवारी म्हटले की, ज्या दोन औषधांच्या चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे, त्या रुग्णांना सुरुवातीच्या टप्प्यावर औषधे दिली जातील आणि त्यांच्यावरील औषधाचा परिणाम ट्रक केला जाईल.
चांगल्या निकालाची अपेक्षा
कंपनीचा असा विश्वास आहे की, दोन्ही अँटीवायरल औषधांचे मिश्रण चांगले क्लिनिकल परिणाम देऊ शकते, तसेच हे औषध रुग्णामध्ये व्हायरसशी लढा देण्याची क्षमता वाढवते किंवा व्हायरसचे परिणाम कमी करते. ग्लेनमार्क कंपनीचे उपाध्यक्ष डॉक्टर मोनिका टंडन यांचे म्हणणे आहे की, हे औषध बरेचसे सुरक्षित आहे आणि कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी हे औषध महत्त्वपूर्ण ठरेल, हे भारतातील एक अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित औषध असल्याचे सिद्ध होऊ शकते.
दरम्यान, या औषधाची चाचणी रुग्णांवर यशस्वी आहे की नाही ते पाहिले जाईल. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत, ही देशासाठी मोठी चिंतेची बाब आहे. आतापर्यंत देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या जवळपास दीड लाख झाली आहे. सर्व प्रयत्न करूनही संसर्ग थांबत नाही. अशा परिस्थितीत जर या औषधाची चाचणी यशस्वी झाली तर ते देशासाठी मोठे यश असेल.