वॉशिग्टंन : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षाच्या मुद्द्यावर मलेरियावरील औषध हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन चा वापर कोरोना रुग्णांवर क्लिनिकल प्रयोगास स्थगिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रप हे कोरोनापासून दूर राहण्यासाठी दररोज हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीनची एक गोळी घेत आहे. त्याचवेळी भारतातही खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य क्षेत्रात आणि कोरोना बाधितांच्या संपर्कात येऊ शकणारे डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस यांना हे औषध घेण्यास परवानगी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात लैंसेंट मध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यास अहवालानंतर हा निर्णय घेतला आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युची शक्यता वाढत आहे.
या अहवालानंतर आता भारतातील शिखर संस्था आई सीएमआरही कोरोना विषाणूने संक्रमित रुग्णांवर हाईड्रॉक्सीक्लोरोक्वीन चा प्रयोग करण्याच्या शिफारशीचे परिक्षण करण्याचा विचार करु लागली आहे.