मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनुष्यबळ मंत्रालयातर्फे आयोजित केलेल्या (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम) स्पर्धा परीक्षेत मुंबई येथील (सायनच्या) शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने पहिला क्रमांक पटकावला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी घेतल्या गेलेल्या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत डी. एस. हायस्कूल मराठी माध्यमाचे एकूण ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी तब्बल ३१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाणार आहे.
या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ३१ विद्यार्थ्यांना शिष्यवरातीचा लाभ मिळणार आहे. इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी, १२ वीच्या विध्यार्थ्यांना चार वर्ष वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत. ज्या अनुदानित शाळेंच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाहून कमी आहे. अशा इयत्ता ८ वी च्या विद्यार्थीना या परीक्षेस पात्र असणार आहेत.या वर्षी यंदाची परीक्षा डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती.
शाळेच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती विभाग प्रमुख पुष्पा लोहकरे व इतर सर्व साहाय्यक शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतले होते. तसेच त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षेचा सराव करवून घेण्यात आला होता. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक अंकुश महाडिक यांनी दिली