मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सरत्या वर्षाला निरोप (31st Celebration) देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे (New year) स्वागत करण्यासाठी आता केवळ काही दिवस उरले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. मात्र, कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर काही बंधने (31st Celebration Night Rules) घातली आहे. नव्या व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता 31 डिसेंबर पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच पार्टी आयोजकांना 12 वाजेपर्यंत परवानगी असणार असल्याची माहिती समोर आली आहे. (31st Celebration Night Rules)
मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नवीन आदेश जारी (31st Celebration Night Rules) केले आहेत. 16 ते 31 डिसेंबर पर्यंत मुंबईत निर्बंध असणार आहेत. गुरुवार (दि.16) पासून 31 डिसेंबर पर्यंत मुंबईत कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे मोकळ्या ठिकाणी पार्टी करण्यास मज्जाव असणार आहे. तसेच, लसीकरणाचे (Vaccination) दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच हॉटेलमध्ये पार्टीला एन्ट्री असणार आहे. 50 टक्के क्षमतेने हॉटेल (Hotel), बार (Bar) सुरु राहतील. यासाठी पूर्ण हॉटेल स्टाफचे लसीकरण आवश्यक असणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. त्यामुळे हॉटेल, पब हे 12 पर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी असण्याची शक्यता आहे. तसेच जर एखाद्या ग्रुपला पार्टीचे (group party) आयोजन करायचे असेल तर पार्टीत सहभागी होणाऱ्या सर्वांचे कोरोना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असले पाहिजेत, हे बंधनकारक आहे. (31st Celebration Night Rules)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दुकान, अत्यावश्यक सेवांची दुकानं, मॉल, इव्हेंटसाठी येणाऱ्या व्यक्तींना लसीकरणाचे दोन डोस बंधनकारक असणार आहे. अशाच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. या काळात वाहन चालकांनी देखील लसीचे दोन डोस घेतलेले असले पाहिजे. राज्यभरात जर प्रवास करणार असाल तर एकतर तुम्ही लशीचे दोन डोस घेतलेले असावेत अथवा 72 तासांपूर्वीच RT-PCR चाचणी केलेली असणे बंधनकारक असणार आहे.
थर्टीफस्टसाठी आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम
पार्ट्यांसाठी हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी 50 टक्के लोकांची उपस्थिती असणार आहे.
असा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी याची माहिती प्रशासनाला कळवणे बंधनकार आहे.
Web Title : 31st Celebration Night Rules | thirty first parties will be allowed till 12 oclock at night rules announced by the mumbai police
Ranveer Singh-Deepika Padukone | रणवीरनं विमानतळावरच केलं दीपिकाला KISS, व्हिडिओ झाला व्हायरल
OBC Reservation Maharashtra | सुप्रीम कोर्टाच्या धक्क्यानंतर ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय
Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत ! ती म्हणाली – ‘मी अपराधीपणाने जगत आहे’