नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन २ रविवारी संपत असताना देशात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात देशात तब्बल २ हजार २९३ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या आता ३७ हजार ३३६ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ७१ जणांचा मृत्यु झाला आहे. देशात आतापर्यंत १ हजार २१८ कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे. त्याचवेळी देशभरात शुक्रवारी १ हजार ८२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
2293 new cases, 71 deaths in the last 24 hours; this is the highest number of cases reported in one day: Ministry of Health and Family Welfare https://t.co/kd8KWQJgY2
— ANI (@ANI) May 2, 2020
महाराष्ट्रात शुक्रवारी तब्बल १ हजार ८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११ हजार ५०६ झाली आहे.
देशातील लॉकडाऊनमध्ये आणखी दोन आठवडे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेड झोनमध्ये १७ मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत.
एनपी न्यूज 24 नेटवर्क