कोलकाता : वृत्तसंस्था – झारखंडनंतर आता पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम न बोलणाऱ्या २० वर्ष युवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ‘जय श्रीराम’ म्हणण्यास नकार दिला म्हणून एका मदरसा शिक्षकाला धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून दिल्याची खळबळजनक घटना कोलकाता येथील पार्क सर्कल स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदरसा शिक्षक हाफीज मोहम्मद शाहरूक हलदर काही कामानिमित्त कोलकाता येथे आला होता. कैनिंग-सियालदाह रेल्वेमार्गावरील लोकलने तो प्रवास करत होता. तो चढल्यापासूनच ट्रेनमधील जमाव त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. ट्रेन हुगळी परिसरातून जात असताना जमावाने त्याला ‘जय श्री राम’ म्हणण्याची सूचना केली. परंतु त्याने जय श्री राम म्हणण्यास नकार दिला. यामुळे ट्रेनमधील जमावाने त्याला जब्बर मारहाण केली. पार्क सर्कल स्टेशनजवळ येताच चालत्या ट्रेनमधून त्याला बाहेर ढकलण्यात आलं. त्यामुळे हलदर गंभीर जखमी झाला. हलदर याने म्हंटले आहे ट्रेनमधील कोणी मला वाचविण्यासाठी पुढे आलं नाही. जेव्हा या टोळक्यांनी ट्रेनमधून बाहेर ढकललं त्यावेळी स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वी झारखंडमधील खारसावन जिल्ह्यातही असाच प्रकार घडला. एका तरुणाला कित्येक तास बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात त्याला जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं जात होतं.
South 24 Parganas: Mannan Mullah was allegedly pushed off a train for not chanting 'Jai Shri Ram' on June 19, says,"we boarded a train from Canning railway station when a group of people got in the train and asked us to chant Jai Sri Ram." (June 25) #WestBengal pic.twitter.com/hboOiWGb2N
— ANI (@ANI) June 26, 2019