मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येत आहे. फेरबदल करताना आता राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे बदली करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे
1. एस.एम. देशपांडे – ( प्रधान सचिव (HR & OM) ते सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय)
2. लोकेश चंद्र – (प्रधान सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई)
3. अंशु सिन्हा – ( सचिव (HR & OM) सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय ते सचिव कौशल्य विकास आणि एंटरपर्नरशिप विभाग, मंत्रालय)
4. एस. एम. चन्ने – (आयुक्त परिवहन मुंबई ते उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ )
5. ए.बी. मिसाळ – ( विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई)
6. रामास्वामी एन – ( मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई ते संचालक राष्ट्रीय आरोग्य मिशन मुंबई)
7. तुकाराम मुंढे ( महानगरपालिका आयुक्त नागपूर ते सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई)
8. राधाकृष्णन बी – (नागपूर महापालिका आयुक्त)
9. विमला आर – ( मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल रुरल लाईव्हहुड मिशन नवी मुंबई ते मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन मुंबई)
10. डॉ. एन.बी. गीते – (व्यवस्थापकीय संचालक महानंदा ते सह व्यवसथापकीय संचालक, एम.एस. इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्यूशन कंपनी औरंगाबाद)
11. अवनीश ढाकणे – (आयुक्त परिवहन मुंबई)
12. के.व्ही. जाधव – (सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी मुंबई ते नाशिक महापालिका आयुक्त)
13. सी.के. डांगे – (संचालक भूजल सर्वेक्षण विकास एजन्सी पुणे)
14. दिपा मुधोल-मुंडे – ( प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई)
15. एस.एस. पाटील – ( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर ते सहव्यवस्थापकीय संचालक सिडको नवी मुंबई)
16. रोहन घुगे – ( प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर ते सहाय्यक जिल्हाधिकारी,चंद्रपूर उपविभाग चंद्रपूर)