‘बाहुबली’मधील अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या आई-वडिलांना झाला ‘कोरोना’, सहकारी कलाकारांनी केली प्रार्थना

बहुजननामा ऑनलाईन टीम – बाहुबली अॅक्ट्रेस तमन्ना भाटियाच्या आई-वडिलांची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तमन्नाने ट्विटरद्वारे ही माहिती देताना म्हटले की, तिच्या सर्व स्टाफची कोविड-19 टेस्ट नेगेटिव्ह आहे.
तमन्नाने इन्स्टाग्रामवर नोट लिहून सांगितले की, मागील काही दिवसांपासून माझ्या आई-वडिलांमध्ये कोविड-19 ची हलकी लक्षणे दिसत होती. सावधगिरी म्हणून सर्व लोकांची तपासणी केली. आता अहवाल आले असून दुर्दैवाने माझे आई-वडिलांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
संबंधित विभागांना माहिती देण्यात आली आहे आणि आम्ही काळजी घेण्यासाठी सर्व उपाय करण्यास सुरूवात केली आहे. माझी आणि कुटुंबाच्या अन्य लोकांसह स्टाफची टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. देवाच्या कृपेने ते ठिक आहेत. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि सद्भावना त्यांना लवकर बरे करतील.
तमन्ना भाटियाच्या या खुलाशानंतर सहकारी कलाकारांनी आणि फॅन्सने तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. काजल अग्रवालने कमेंट केले – अंकल-आंटीसाठी प्रार्थना करते. ते लवकर बरे होतील. टॅमी तु सुद्धा काळजी घे. ईशा गुप्ताने सुद्धा तमन्नाच्या आई-वडिलांसाठी प्रार्थना केली.
तमन्ना भाटियाने हिंदी सिनेमामध्ये पुन:पदार्पण नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सोबत बोले चुडियामध्ये केले होते. नवाजच्या भावाने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. तत्पूर्वी ती खामोशी मध्ये दिसली होती. तमन्नाने 2005 मध्ये आपल्या करियरला हिंदी फिल्म इंडस्ट्रीतून सुरूवात केली होती, पण एकदोन चित्रपट केल्यानंतर ती साऊथला गेली. 2013 मध्ये ती पुन्हा हिम्मतवालातून हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये परतली.
Comments are closed.