नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये पसरलेल्या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून या व्हायरसमुळे आणखी २५ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. तसेच यामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १३२ वर पोहोचली असून सहा हजारांपेक्षा जास्त लोकांना याचा प्रादुर्भाव झाला असल्याची मिळत आहे. पुढे येणाऱ्या दहा दिवसात याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहितीही मिळत आहे.
चीनचे आरोग्य अधिकारी यांनी व्हायरसच्या संसर्गाच्या ५९७४ प्रकरणांची पुष्टी झाली असून न्यूमोनियाची ३१ नवीन प्रकरणे मंगळवारपर्यंत नोंदवली गेली आहेत. तसेच व्हायरसमुळे आतापर्यंत एकूण १३२ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारपर्यंत हुबेई प्रातांत कोरोनामुळे १२५ लोकांचा मृत्यू झाला असून ३५५४ लोकांना प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना व्हायरसने ग्रासलेल्या पीडितांमधील १२३९ जणांची परिस्थीती गंभीर असून या व्हायरसमध्ये अनेक विषाणू आहेत. पण त्यापैकी फक्त सहाच विषाणू मनुष्यांसाठी हानिकारक आहे. २००२-२००३ झाली चीन आणि हॉंगकॉंगमध्ये याचा व्हायरसमुळे ६५० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
Visit : bahujannama.com