महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संत सावता महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने तालुक्यातील शिक्षकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील ३० शिक्षक दांपत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलतांना जो शिकला तोच टिकला, शिक्षणाअभावी मानवाची अधोगती झाली आहे. हे ओळखून गरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा नेणाऱ्या, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे. त्यांचे विचार आचरणात आणने हीच त्यांना आदरांजली ठरेल. इतकेच नव्हे तर ‘सुजान आणि आदर्श नागरिक घडवून समाज उभारणीचा पाया रचणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे म्हणजे त्यांच्या महान कार्याला अभिवादन करणे आहे. यातून सर्वांना प्रेरणा मिळेल. असे सद्गुरू उद्योग समुहाचे अध्यक्ष उद्धव नेवसे यांनी म्हंटले आहे.
याचबरोबर ‘चूल आणि मूल’ या व्याखेतून महिलेला बंधनाच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आमचा सत्कार केला ही अभिमानाची गोष्ट असली तरी यामुळे वाढलेल्या जबाबदारीचीही जाणीव झाली आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमात गौरव झालेले शिक्षक नवनाथ अडसूळ यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर ‘शिक्षक दांपत्यांच्या सत्काराचा सावता महाराज देवस्थान ट्रस्टचा उपक्रम स्तूत्य आहे. शिक्षक हाच समाज रचनेचा खरा पाया आहे. ही शिकवण आपल्याला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली आहे. त्यांनी समाजाला जागृत करताना विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतिविना वित्त गेले आणि वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे सांगितले. हे आता ओळखून त्या प्रमाणे वागण्याची गरज आहे. असे गुरूवर्य अमृतराव खराडे यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य अमृत खराडे हे होते. यावेळी श्रीमती भामाबाई राउत, संतोष म्हेत्रे, उद्धव भोगे, दादासाहेब सोनमाळी, मनीषा सोनमाळी, राणी गदादे, प्रकाश खंदारे, डॉ. कांचन खेत्रे, आशा क्षीरसागर, अॅड. नवनाथ फोंडे, भीमराव नलवडे, आबा पाटील, पंढरीनाथ काकडेमहाराज, भास्कर भैलुमे, शिवाजी शेळके, शिवाजी बेलेकर, वृषाली धेंडे, दशरथ देशमुख, अनिल गदादे, भास्कर भैलुमे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोदड सोनमाळी, रामदास हजारे, शरद म्हेत्रे, अभिमन्यू शिंदे, चंद्रकांत राउत, विशाल म्हेत्रे, रवींद्र राऊत , अशोक नेवसे आदी उपस्थित होते.