जम्मू : वृत्तसंस्था – तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना… या गाण्याच्या बोला प्रमाणेच एक घटना जम्मू मध्ये समोर आली आहे. चक्क परिवाराच्या विरोधात जाऊन एका शीख महिलेने स्वतःच्या मुस्लिम मैत्रिणीला किडनी दान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. म्हणतात ना मैत्री मध्ये कोणताही धर्म, पंथ, जात आडवी येत नाही. हे यावरून सिद्ध झाले आहे.
उधमपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेली समरिन नामक महिलेला. सततच्या आजार पणा मुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केले नंतर समरीन यांच्या कुटुंबियांना कळाले की, समरिन यांना जर आजारपणापासून बरे करायचे असेल तर त्यांना किडनीची आवश्यकता आहे. मात्र किडनी मिळणे हे सोपे नाही. विशेष म्हणजे किडनी त्याच रक्तगटाची पाहिजे. किडनी दान करणाऱ्यावर कुठलीही शस्त्रक्रिया झालेली नसावी. असे अनेक नियम असतात. विशेष म्हणजे जर कोणाला किडनी दान करायची असेल तर दान करणाऱ्या सोबतच संपूर्ण परिवाराची परवानगी घेण्यात येते.
दरम्यान एका शीख महिलेने समरिन यांना किडनी देण्याचे म्हंटले आहे. सामाजिक कार्यकर्ती मंजोत सिंग असे त्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे समरीन आणि मंजोत सिंग या दोघी मैत्रिणी आहेत. इतकेच नव्हे तर मंजोत सिंग यांनी चक्क परिवाराच्या विरोधात जाऊन मुस्लिम मैत्रीण समरिन यांना किडनी देण्याचे म्हंटले आहे.
दरम्यान समरीन आणि माझी गेल्या चार वर्षांपासून मैत्री आहे. समरिन आणि माझे भावनिक बंध जुळले आहेत. तिला किडनीची आवश्यकता आहे. किडनी दान करण्यास मी तयार आहे. माझ्या कुटुंबाचा विरोध असला, तरी माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. मानवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. यातूनच मला प्रेरणा मिळते. असे मंजोत सिंग यांनी म्हंटले आहे.
याचबरोबर माझ्याशी स्वतः मंजोत सिंग यांनी संपर्क साधून मला त्यांच्या निर्णयाची कल्पना दिली. त्यांच्या निर्णयावर मला सुरुवातीला मात्र त्यानंतर प्रत्यक्ष भेटून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. असे समरिन यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे मंजोत सिंग आणि समरीन या दोघींनी शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेच्या डॉक्टरांच्या वागणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली असूनही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर टाळाटाळ करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया लवकर व्हावी, यासाठी मंजोत यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच शस्त्रक्रियेला परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.