मुंबईतील दादर स्टेशनचे नाव नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेशन करा अशी मागणी भीम आर्मी तर्फे करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर महापरिनिर्वाण दिनापर्यंत हे नामांतरण करा अन्यथा चैत्यभूमीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. इतकेच नव्हे तर पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर, प्रभादेवी या स्टेशनची नावं बदलण्यात आली. मग दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचे नाव का दिले जात नाही, असा प्रश्न भीम आर्मीने उपस्थित केला आहे. याचबरोबर ६ डिसेंबर पर्यंत दादर स्टेशनचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेशन केले नाही तर ६ डिसेंबरला भीम आर्मी स्वतःच दादर स्टेशनचे नामांतर करणार असा इशारा भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला होता.
इतकेच नव्हे तर दादर स्टेशनचे नाव नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेशन करा अशे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. मात्र भीम आर्मीच्या या मागणीला भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे.