जामनेर : बहुजननामा ऑनलाईन – बंजारा समाजाने एकत्र येऊन संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्वप्रथम बंजारा भाषेत भजन करून आपले मनोगत व्यक्त केले. यावर्षी सालाबादप्रमाणे नगरपालिका ते कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव रोडपर्यंत रॅली आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत समाजातील विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.
वसंतराव नाईक विकास महामंडळ निधी हा वाढवून मिळावा, जातीचा दाखल्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात त्यासाठी हुशार व होतकरू समाजाच्या तरुणांसाठी एक कार्यालय उघडण्यात यावे जेणेकरून विद्यार्थी व विद्यार्थिनींची धावपळ होणार नाही व जातीच्या दाखल्यासाठी १९६१ पुरावा लागत असल्याने संघटनेचे पत्र जोडून हा त्रास कमी करावा. व सर्व पक्षांचे पुढारी व संघटना संघटक हे समाजाचे काम पाहात आहेत.