बाळासाहेब चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर समाज सेवा अखंडितपणे चालू ठेवली आहे. गोरगरिबांना मदत करणे, कष्टकरी व कामगारांना न्याय व युवकांना रोजगार मिळवून देणे,तसेच त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहे. पोलिसांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न त्यांनी दिल्ली पर्यंत पोहोचवला. समाजात त्यांना त्यांच्या कामामुळे आदराचे स्थान निर्माण झाले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०१८ समाजभुषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते रिपब्लिकन सेना पुणे शहर अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण याना २०१८ समाज भुषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी वडगांवशेरी मतदार संघाचे आमदार जगदीशजी मुळिक हे देखील उपस्थित होते. बाळासाहेब चव्हाण यांच्यावर समाजातील प्रत्येक स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इतकेच नव्हे तर गणेशदादा विटकर मित्र परिवार तर्फ नोटांचा हार घालून त्याच्या सन्मान करण्यात आला.
समाजातील प्रत्येक स्थरातून बाळासाहेब चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यावेळी गणेशदादा विटकर मित्र परिवार तर्फ नोटांचा हार घालून त्याच्या सन्मान करण्यात आला.