नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधान प्रकरणी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर नाशिक न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.
नाशिक येथे शिवप्रतिष्ठान तर्फे सभा आयोजित करण्यात आली होती दरम्यान सभेत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी ” माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले जन्माला येतात ” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी ‘लेक लाडकी अभियान ‘ या संस्थेने या वादग्रस्त वक्तव्यामुळे संभाजी भिडेंविरोधात पुणे येथील आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान संभाजी भिडेंन विरोधात दाखल झालेल्या तक्रारीची दाखल घेत संभाजी भिडेंन विरोधात चौकशी करून नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता.
विशेष म्हणजे जिल्हा सत्रन्यायालयात दावा दाखल झाल्या नंतरही संभाजी भिडे न्यायालयात हजार झाले नाही. इतकेच नव्हे तर दरम्यान समन्स बजावूनही भिडेगुरुजी यापूर्वी तीन वेळा न्यायालयासमोर हजर राहू शकले नव्हते. मात्र संभाजी भिडे आज न्यायालयापुढे हजर झाले. त्यानंतर न्यायालयातर्फे पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची जमीन करण्यात आली.
दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी आपला बंदोबस्त तैनात केला होता.