गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाली होती़. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल झाली होती. इतकेच नव्हे तर या दंगली मध्ये नक्षलवाद्यांचा हात असून एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांकडून पैसा पुरविण्यात आल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विजयस्तंभाला दरवर्षी २ ते ४ लाख भाविक अभिवादन करण्यासाठी येत असतात. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी १ जानेवारीला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात कोठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण पोलीस दल, लोणीकंद पोलीस स्टेशन, तसेच पुणे पोलीस आयुक्तालय हे तिन्ही पोलीस दल एकत्रितपणे परस्परांशी संवाद साधून आवश्यक ती पावले उचलणार आहेत.
विशेष म्हणजे १५ आॅगस्ट २०१८ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली़. त्याचबरोबर ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे़. मात्र, या प्रस्तावाला अजून मंजूरी मिळालेली नाही. मात्र लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे या अगोदरच्या नियोजनानुसार २६ जानेवारीला पुणे पोलीस दलाकडे हस्तांतरीत करण्याचे शासन पातळीवर निश्चित केले जात होते.मात्र १ जानेवारीच्या विजयस्तंभाला होणाऱ्या गर्दीचा विचार करुन ते त्या अगोदर पुणे पोलीस दलाकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु झाल्या आहेत.
मात्र लोणीकंद पोलीस ठाणे पुणे पोलीस दलात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे़ मात्र, शासनाकडून प्रत्यक्ष आदेश येईलपर्यंत त्यावर बोलता येणार नाही.असे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी म्हंटले आहे.