नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील धोबी समाज अत्यंत मागासलेला असून, या समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाल्यास सामाजिक स्तर उंचावेल, असा आशावाद सटाणा येथे झालेल्या समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य धोबी-परीट सर्व भाषिक समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष देवराव सोनटक्के यांच्या विचाराने प्रेरित होऊन सटाणा येथे बागलाण, कळवण आणि देवळा या तालुक्यांतील सर्व भाषिक समाज बांधवांचा मेळावा पार पडला.
या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य महासचिव जयराम वाघ, महाराष्ट्र प्रदेश कला-क्रीडा अध्यक्ष मनोज म्हस्के, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे सुरेश शिरोडे, एमएसईबीचे सुशांत मोतीकर, मनसेचे पदाधिकारी अमर जमधडे, नाशिक जिल्हा कार्यकर्ते गणेश वराडे, सी. आर. परदेशी, राजाभाऊ बोरसे आदी उपस्थित होते. बागलाण तालुकाध्यक्ष सुरेश मोगरे, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश मोगरे, कार्याध्यक्ष अनिल मोगरे, उपाध्यक्ष सतीश खैरनार, सचिव नंदू परदेशी, सहसचिव भरत परदेशी, खजिनदार सुनील अंतुरेकर, सहखजिनदार अशोक मोगरे, सदस्य सुभाष शिंदे, दीपक मोगरे, संजय खैरनार, भगवान परदेशी, बागलाण युवा संघटन तालुकाध्यक्ष चंदन शिंदे, उपाध्यक्ष योगेश मोगरे, शहराध्यक्ष विशाल खैरनार, उप शहराध्यक्ष दिनेश मोगरे, कार्याध्यक्ष प्रीतम शिंदे, उपकार्याध्यक्ष हेमंत शिंदे, सचिव सूरज मोगरे, सहसचिव हर्षल परदेशी, संघटक कुणाल परदेशी, खजिनदार प्रकाश मोगरे, सहखजिनदार पंकज मोगरे, सदस्य मनोज अंतुरेकर आदी उपस्थित होते.