शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र यावी ही बाळासाहेबांची इच्छा
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बाळासाहेबांनी प्रथम शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. तुम्ही काँग्रेसकडे असल्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसतो, त्यासाठी आठवले तुम्ही युतीत या असा प्रस्ताव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने कलर्स मराठी’ या वाहिनीवर ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा हा कार्यक्रम घेतला जात आहे. या कार्यक्रमात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील बाळासाहेबांना जाणणारे अनेक मान्यवर बाळासाहेबां बद्दल आपले मनोगत व्यक्त करत आहेत.
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास विरोध नव्हता तर विद्यापीठाच्या नावात मराठवाडा हा शब्द ठेवण्याचा त्यांचा आग्रह होता. बाळासाहेबांच्या सूचनेनंतर मराठवाडा हे नाव कायम ठेवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले. याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनावेळी मी बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी मला सुरूवातीलाच सांगितले की, माझा बाबासाहेबांच्या नावाला विरोध नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. पण त्या नावात मराठवाडा हे नावही असले पाहिजे, अशी त्यांनी सूचना केली. त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले.
इतकेच नव्हे तर, बाळासाहेबांनी प्रथम शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. तुम्ही काँग्रेसकडे असल्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसतो, त्यासाठी आठवले तुम्ही युतीत या असा प्रस्ताव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. असेही ते म्हंटले. दरम्यान आम्ही एकत्रित येऊन पत्रकार परिषदही घेतली होती. असेही ते म्हंटले. विशेष म्हणजे, अश्या अनेक गोष्टी सांगून त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी ताज्या केल्या.