सातारा : बहुजननामा ऑनलाइन – आगामी निवडणुकीत आमची कॉंग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी झाली तरी, ऍट्रॉसिटी आणि भिडे गुरूजींच्या मुद्यांवर आमचा खासदार उदयनराजे भोसले यांना टोकाचा विरोध राहिल. याबाबत आणि आघाडी बाबत आमच्याही काही अटी, शर्ती असतील. असे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी म्हंटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करणार असल्याचे चिन्ह आहेत, विशेष म्हणजे काही लोकसभा मतदार संघामध्ये प्राबल्य असलेल्या उमेदवारांनासाठीच तेथील जागा सोडली जाते. दरम्यान सातारा लोकसभा मतदार संघात उदयनराजे प्राबल्य आहे. त्यामुळे आघाडी झाली तरी त्यांची उमेदवारी अबाधित रहाणार आहे. मात्र सातारचे विद्यमान खासदार उदयनराजेंनी ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी भुमिका घेतली होती. तसेच संभाजी भिडे गुरूजींची पाठराखण केली होती. तरीही तुमचा त्यांना पाठींबा राहणार का ? असा प्रश्न सातारा भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांना विचारला.
दरम्यान कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना आमच्या ही काही अटी, शर्ती आहेत. इतकेच नव्हे तर, आघाडी धर्म कसा पाळायचा हेही ठरवूनच आघाडी केली जाईल. पण ऍट्रॉसिटी आणि भिडे गुरूजींच्या मुद्द्यावर आमचा खासदार उदयनराजे भोसले यांना टोकाचा विरोध रहाणार आहे. आणि यामध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नाही. असे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे, येत्या २५ जानेवारी शुक्रवारी गांधी मैदानावर दुपारी तीन वाजता वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे. आणि या सभेत प्रकाश आंबेडकरच आणि एमआयएमचे नेते, खासदार असुदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत.