नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संकटादरम्यान, अमेरिकेची एस्ट्राजेनेका कंपनी लवकरच खुशखबर देणार होती, मात्र, सध्यातरी जगाला एक मोठा धक्का बसला आहे. एस्ट्राजेनेकाने आपला अंतिम टप्पा थांबवला आहे. एस्ट्राजेनेका वॅक्सीन ट्रायल मानवी परीक्षणात सहभागी झालेला एक वॉलिंटियर आजारी पडल्यानंतर थांबवण्यात आली. एस्ट्राजेनेकाने एका वक्तव्य जारी केल आहे की, हा एक रूटीन अडथळा आहे, कारण परीक्षणात केवळ एका व्यक्तीच्या आजाराबाबत जास्त काही माहिती मिळालेली नाही. याचे व्यवस्थित अवलोकन केल जाईल आणि त्यानंतर पुन्हा ट्रायल सुरू होईल.
तर, हेल्थ न्यूज वेबसाइट स्टेट न्यूजच्या रिपोर्टनुसार, ट्रायलमध्ये भाग घेणार्या एका वॉलिंटियरमध्ये वॅक्सीनचे संशयास्पद गंभीर प्रतिकूल परिणाम दिसून आले आणि यामुळे वॅक्सीनच्या अंतिम फेजची ट्रायल थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत औषध विकसित करणारी कंपनी एस्ट्राजेनेका कोविड -19 वॅक्सीन जागतिक रेसमध्ये सर्वात पुढे आहे.
एस्ट्राजेनेकाच्या प्रवक्त्याच्या एका संदर्भाने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मानक पुनरावलोकन प्रक्रियेमुळे वॅक्सीनच्या सुरक्षा डाटाचे पुनरावलोक करण्यासाठी लशीची ट्रायल थांबवण्यात आली आहे. अभ्यासात युनायटेड किंगडमसह विविध ठिकाणांवर एस्ट्राजेनेका आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या संशोधकांद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोविड-19 वॅक्सीनचे परीक्षण होत आहे, याठिकाणी प्रतिकूल घटनेची माहिती मिळाली होती.
मात्र, प्रकरण कशा प्रकारचे होते आणि वॅक्सीनची प्रतिकूल प्रतिक्रिया केव्हा दिसून आली, याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. मात्र, सांगितले जात आहे की, ज्या सहभागींवर वॅक्सीनची ट्रायल केली गेली आहे, ते रिकव्हर होतील.
कोरोना वॅक्सीनची ट्रायल रोखल्याने अन्य एस्ट्राजेनेका वॅक्सीनची चाचणी प्रभावित झाली आहे. सोबतच वॅक्सीन निर्मार्त्यांकडून करण्यात येत असलेली क्लिनिकल ट्रायलसुद्धा प्रभावित झाली आहे. आता ते सर्वजण अशा संकेतांच्या शोधात असतील, जेणेकरून योग्य प्रभाव समजून घेता येतील.
एस्ट्राजेनेकाच्या प्रवक्त्याने वक्तव्यात म्हटले आहे की, मोठ्या परीक्षणांमध्ये योगायोगाने व्यक्ती आजारी पडली असेल, परंतु याकडे लक्ष देऊन स्वतंत्रपणे पनरावलोकन केले पाहिजे. स्टॅट यांनी सांगितले की, गंभीर प्रतिकूल प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात आणि यामध्ये ते मुद्दे सहभागी केले जाऊ शकतात, जसे की हॉस्पीटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते, धोकादायक आजार होऊ शकतात आणि मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
सध्या, एस्ट्राजेनेकाने अजूनपर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, नऊ प्रमुख यू.एस. आणि युरोपीयन वॅक्सीन डेव्हलपर्सने मंगळवारी कोरोना व्हायरस महामारीवर नियंत्रण करण्यासाठी अर्जंन्सीशिवाय प्रयोगात्मक वॅक्सीनसाठी शास्त्रीय सुरक्षा आणि प्रभाविकारक मानका कायम ठेवण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी म्हटले की, वॅक्सीनची तातडीने गरज आहे, पण आम्ही याची मानके आणि प्रभावाशी ताडजोड करणार नाही. प्रत्येक प्रकारे तपासणी केल्यानंतरच वॅक्सीनला मंजूरी देऊ. कोरोना वॅक्सीन बनवण्याच्या रेसमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन, मर्क अँड कंपनी, मॉडर्ना इंक, नोवावेक्स इंक, सनोफी, फिजर, ग्लॅक्सोस्मितक्लीन, बायोनेट इत्यादींचा समावेश आहे.