अकोला : बहुजननामा ऑनलाइन – कोरगाव-भीमा येथील विजय स्तंभाची ४२ फूट उंच प्रतिकृती शौर्य दिनानिमित्त अकोल्यातील अशोक वाटिका परिसरात उभारण्यात आली. दरम्यान विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी शहारांसोबतच जिल्हाभरातील आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.
पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्षे पूर्ण झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात.
दरम्यान बरेच अनुयायी कोरगाव-भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी इच्छा असतांनाही जाऊ शकत नाही त्यामुळे, अकोला येथील आंबेडकरी अनुयायांनी शौर्य दिनानिमित्त आभिवादन करण्यासाठी कोरगाव-भीमा येथील विजय स्तंभाची ४२ फूट उंच प्रतिकृती अकोल्यातील अशोक वाटीका परिसरात उभारली आहे. इतकेच नव्हे तर शहरातीलच नव्हे तर जिल्हाभरातील आंबेडकरी अनुयायांनी आभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.