लातूर : बहुजननामा ऑनलाइन – चाकूर तहसील कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी आरक्षण सौरक्षण कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात यासंदर्भात आंदोलन मोर्चे काढण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यात आले. दरम्यान मराठा आरक्षणा नंतर मुस्लिम, धनगर, ओबीसी समाजांनीही आरक्षणासाठी हालचाली सुरु केल्या. दरम्यान ९ जानेवारीला मुंबई उच्चन्यायालयात ओबीसी आरक्षण याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान मुंबई उच्चन्यायालयात ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आले आहे. याचबरोबर राज्य सरकारला जातींचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करु. असा इशाराही ओबीसी संघटनांनी दिला होता.
दरम्यान चाकूर तहसील कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी आरक्षण सौरक्षण कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन चाकूर तहसीलदार यांना देण्यात आले.
या होत्या मागण्या
मूळ ओबीसींसाठी स्वतंत्र आणि मराठा समाजासाठी एस.ई.बी.सी. अशी वर्गवारी करावी
मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारने तत्परता दाखवली आहे. तीच तत्परता ओबीसी समाजासाठी मेगा भरतीपूर्वी दाखवावी
मेगा भारतीपूर्वी ओबीसी समाजातील नोकऱ्यांच्या अनुशेष भरून काढावा.
अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विधेयक मांडताना मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही. असा पुनरुच्चार त्यांनी केला होता. मात्र ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विश्वास नसल्याचे पहायला मिळाले होते.