परभणी : बहुजननामा ऑनलाइन- राष्ट्रवादी पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अनोखी शक्कल लढवत, जनतेला नववर्षाच्या शुभेच्या देत, ‘खासदार बदला, जिल्हा बदलेल… वेळ आहे परिवर्तनाची, गरज आहे विकासाची’ अशी जाहिरात प्रकाशित केली आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणी जिल्ह्यात गेल्या कित्तेक वर्षांपासून शिवसेनेचाच खासदार आहे. विशेष म्हणजे इतक्या वर्षात निवडून आलेला शिवसेनेचा खासदार दुसऱ्यावेळी शिवसेनेकडू लोकसभा निवडणूक न लढवता दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. इतकेच नव्हे तर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्या नंतर कोणत्याही शिवसेनेचा खासदार असलेल्या नेत्याने लोकसभा जिंकली नाही. मात्र यावेळी परभणी लोकसभा कुठल्याही परिस्थितीत राष्टवादी कडे आली पाहिजे असा आदेश पक्षाने दिला असता, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत.
यातच नववर्षाच्या शुभेच्छा देत, ‘खासदार बदला, जिल्हा बदलेल… वेळ आहे परिवर्तनाची, गरज आहे विकासाची’ अशी जाहिरात प्रकाशित करण्यात आली. इतकेच नव्हे तर सतत शिवसेनेचा खासदार निवडून दिल्याने जिल्ह्याची अवस्था बकाल झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीचा विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला हरवून राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आणल्याशिवाय परभणीचा विकास शक्य नाही. असेही जाहिरातीत म्हंटले आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेने आजपर्यंत केवळ जातीय तेढच निर्माण केल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी जाहिरातीतून केला आहे. .
आतापर्यंतच्या खासदारांची यादी
पहिली लोकसभा १९५२-५७ एन.के. पनगरकर काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ एन.के. पनगरकर काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ शिवाजीराव देशमुख काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ शिवाजीराव देशमुख काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ शिवाजीराव देशमुख काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० शेषराव देशमुख शेकाप
सातवी लोकसभा १९८०-८४ आर.एन. यादव काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ आर.एन. यादव काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ अशोक आनंद देशमुख शिवसेना
दहावी लोकसभा १९९१-९६ अशोक आनंद देशमुख शिवसेना
अकरावी लोकसभा १९९६-९८ सुरेश रामराव जाधव शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ सुरेश वारपुडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुरेश रामराव जाधव शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ तुकाराम रेंगेपाटील शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ गणेशराव दुधगांवकर शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४- संजय हरीभाऊ जाधव शिवसेना