लातूर : बहुजननामा आॅनलाइन – पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यरत असताना महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांचा दलितविरोधी व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनी दलितांवर केलेल्या अन्यायाची कबुलीच या व्हिडीओमध्ये दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी लातूरमधील चाकूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी दलितविरोधी भूमिका घेत अनेक आक्षेपार्ह विधाने केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणीचे एक निवेदन तहसीलदारांमार्फत चाकूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर कष्टकरी जाणीव संघटनेचे विष्णू तिकटे, महिला राजसत्ता आंदोलनाच्या मायाताई सोरटे, मारुती कांबळे, लक्ष्मण तिकटे, डी. जे. भालेराव, सुजित कांबळे, दीपक कांबळे, व्ही. एस. पँथरचे तालुकाध्यक्ष शरद किनीकर, अजय श्रंगारे, व्यंकट गुळवे, एल. पी. गुंजरगे, बापू वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.