पुणे : बहुजननामा ऑनलाइन- कामावर जाणाऱ्या व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी अडवून शस्त्राचा धाक दाखवून खिशातील 2 हजार रुपये काढून नेल्याची (robbed youth in Katraj) घटना कात्रज येथे घडली आहे. यावेळी नागरिक जमा झाल्यानंतर त्यांना देखील या चोरट्यांनी धमकावले. तर दुकानदारांना दुकाने बंद करण्यास लावत दहशत निर्माण केली आहे.
याप्रकरणी संजय शेडगे (वय 51, रा. शेलारमळा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस (Bharati Vidyapeeth police) ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार दुचाकीवरील दोघा अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हे गोकूळनगर येथील खासगी कंपनीत नोकरी करतात.
ते रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यास निघाले होते.
यावेळी कात्रज कोंढवा रस्त्यावरील (Katraj Kondhwa Road) माऊली कमानीजवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याना अडविले.
त्यांना शस्त्र दाखवून धमकावले आणि त्यांच्या खिशातून 1 हजार 900 रुपये काढून घेतले (youth robbed in Katraj).
तर यावेळी नागरीक जमा झाल्यानंतर त्यांना धमकावले व परिसरात मोठमोठ्याने शिवीगाळ करत दुकाने बंद करण्यास भाग पाडून दहशत पसरवली.
त्यानंतर हे आरोपी तेथून पसार झाले आहेत.
अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
web title : Youth robbed in Katraj
Covid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा