पुणे : बहुजननामा ऑनलाईन– सोसायटीचा रस्ता Society Road वापरण्यास विरोध केल्यानंतर सुरक्षा रक्षकाला Security Guard पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. एनआयबीएम रस्त्यावरील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संजय माळी Sanjay Mali (वय 39, रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलीस Kondhwa Police ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांवर गुन्हा Crime दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळी कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर NIBM Road असलेल्या कुमार प्रिटॉन सोसायटीत सुरक्षा रक्षक Security Guard म्हणून काम करतात.
दोन दिवसांपूर्वी ते सोसायटीच्या तीन नंबरच्या गेटवर ड्युटी करत होते.
यावेळी सोसायटीच्या रस्त्यावरुन टोळके निघाले होते.
त्यावेळी त्यांनी सोसायटीतील रस्ता खासगी असून सार्वजनिक वापरास मनाई आहे, असे आरोपींना सांगितले.
त्यानंतर या टोळक्याने तुला बघून घेतो, अशी धमकी Threat घेऊन आरोपी तेथून निघून गेले.
त्यानंतर दुपारी पावणेचारच्या सुमारास टोळके पुन्हा आले.
त्यांनी माळी याला बेदम मारहाण करून प्लास्टिक खुर्ची डोक्यात मारली.
आरोपी दुचाकीवरून पसार झाले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दीपक बर्गे Assistant Inspector Deepak Barge करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
Youth robbed in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने लुटले
Covid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा
दारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती, भररस्त्यात केली बाटलीची पूजा, व्हिडिओ वायरल