नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे मागील साडेतीन महिन्यांपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये लोक काय करतील याचा भरवसा नाही. लॉकडाऊनमध्ये सुरुवातील गुन्ह्याच्या घटनांमध्ये मोठी घट झाली होती. त्यानंतर मात्र गेल्या काही आठवड्यांपासून क्राईममध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. पैसे कमविण्याच्या हेतूने तिघांनी स्टेट बँकची बनावट ब्रांच उघडली होती. त्यासाठी सेटअप लावण्यातही आला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे तिघांना अटक करण्यात आली आहे.
कुडलोर जिल्ह्यातील परूट्टी येथे स्टेट बँकेच्या माजी कर्मचार्याच्या 19 वर्षांच्या मुलाने स्टेट बँकेची बनावट शाखा उघडली होती. आता स्टेट बँकेच्या मूळ शाखेच्या व्यवस्थापकाला हे सेटअप पाहून आश्चर्य वाटले. कारण ते पूर्णपणे स्टेट बँकेप्रमाणेच तयार केले गेले होते. एसबीआयच्या एका माजी कर्मचार्याचा मुलगा कमल बाबूने संगणक, लॉकर, बनावट कागदपत्रे आणि इतर वस्तू बनावट बँकेत ठेवून अगदी बँकेसारखे तयार केले. पानरुटी मार्केटच्या नावाने एक वेबसाइट तयार केली गेली.
लॉकडाऊनमुळे या तरुणाने केलेला प्रताप समोर आल्यानंतर आता त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. पोलिसांनी कमल तसेच ए कुमार (वय 42) आणि एम माणिकम यांना अटक केली आहे. एसबीआयच्या एका ग्राहकाने उत्तर बाजार शाखेत या शाखेबाबत चौकशी केली असता या बनावट शाखेची पोल उघडकीस आली. जेव्हा एका ग्राहकाने या बनावट शाखेतील स्लिप उत्तर बाजार शाखेच्या व्यवस्थापकाला दाखविले तेव्हा त्यांना धक्का बसला.