बहुजननामा ऑनलाईन टीम – भारतातील राधे माँ ला तर सगळेच ओळखतात. पण आता पाकिस्तानातील राधे माँ चा ही फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात नवरीच्या वेशभूषामध्ये राधे माँ च्या नावा खाली मुस्लिम धर्मगुरू नागरिकांना धर्मची शिक्षा देतात. नारंगी रंगाच्या दाढी मध्ये नवरीच्या वेशभूषेत असलेला फोटो सोशल मीडियावर जोरात वायरल होत आहे.
नेहमी मुस्लिम धर्माबाबतची शिकवण देताना या गुरूला नवरीच्या वेशभूषेत राहण्यास आवडते. आणि त्या ठिकाणालाही लग्नाच्या घरासारखे सजवण्यात येते. या धर्मगुरू बद्दल लोकांना अधिक माहिती नाही. परंतु या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे की नागरिक धर्मगुरूकडे पैसे देऊन आशीर्वाद घेत आहेत. धर्मगुरू जवळ जाताच नागरिक नाचायला लागतात.
सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या या फोटोना पाहिल्यानंतर लोकांनी या धर्मगुरुवर कारवायी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी यासाठी सोशल मीडियावर कॅम्पियन ही सुरु केले आणि पाकिस्तानी सरकारकडे या धर्म गुरूना पकडण्याची मागणीही केली. धर्माच्या नावाखाली हा व्यक्ती लोकांची फसवणूक करत आहे. अशा व्यक्तीला लवकरात लवकर ताब्यात घ्यावे. अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.