मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नुकताच भाजपमधील दोन नेत्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ समोर आल्यामुळे हिमाचल प्रदेशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ हिमाचल भाजपा महिला मोर्चामधील एका महिलेचा आहे. या व्हिडीओमध्ये महिलेसोबत एक पुरुष नेता देखील आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्षाने या दोघांवरही कारवाई केली आहे आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्याशी संबंधित आहे.
१२ मिनिटचा हा व्हिडीओ कुठल्यातरी सरकारी अतिथीगृहातील बाथरूमधील असावा. व्हिडीओ बघितल्यानंतर असे वाटे आहे की, दोघांच्या सहमतीने हा व्हिडीओ तयार केल्याचे दिसते आहे. मात्र हा व्हिडीओ कुठून व्हायरल झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली, परंतु पोलिसांनी आतापर्यंत कोणाविरुद्धही तक्रार केली नाही.
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्यांच्या जवळ दोघांनविरुद्ध कुठलीही तक्रार आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ”या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशा लोकांना पक्षात स्थान असता कामा नये.