नागपूर बहुजननामा ऑनलाईन – भीम हा शब्द जातीवाचक असल्याच्या सबबीवरून भीमसेना या राजकिय पक्षाची नोंदणी प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या निर्णय़ाला आव्हान देण्यात आले आहे.त्यावर सुनावणी करताना न्यायलायने यावर आठ आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश देत नोटीस बजावली आहे.
काय आहे आक्षेप ?
भीमसेना या राजकिय पक्षाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा शब्द जातीवाचक अशल्याचे सांगत तो धर्म दर्शवतो असे म्हटले. त्यामुळे पक्षाकडून नवीन पर्याय सुचवले. त्यानुसार पक्षाकडून निवडणूक आयोगाला भीम सेना स्वाभीमानी, भीम सेना इंडियन आदी पर्याय पाठविले गेले. परंतु पक्षाकड़ून पाठवविलेले पर्याय पोहोचण्याआधीच १६ मार्च २०१८ रोजी निवडणूक आयोगाने नावातील त्रुटींवर बोट ठेवून ही नोंदणी प्रक्रिया थांबवली.
भीमसेनेकडून उच्च न्यायालयात धाव
भीमसेनेने यांसदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार त्यांनी उच्च न्यायालयात भीम हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावातून घेण्यात आला आहे. तो धर्मवाचक नाही. त्यासोबतच सद्यस्थितीत या नावाचा समावेश असलेले बहुजन भीम सेना, भीम पॅंथर आदी नावाचे राजकिय पक्ष अस्तित्वात आहेत. या सर्व पक्षांच्या नावात भीम हा शब्द आहे. त्यांच्या नावाला आजपर्यंत आक्षेप घेतला गेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने भीमसेना पक्षाची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यास हरकत घेऊ नये असे याचिककर्ते म्हणाले.
८ आठवड्यात उत्तर देण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश
उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत ८ आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यांकडून अड. प्रदिप वाठोरे यांना बाजू मांडली तर निवडणूक आयोगातर्फे अड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.