सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवणच्या वतीने संत गुरू रविदास दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा कट्टा, मालवण येथील ओमसाई मंगल कार्यालय (मामा माडये हॉल) येथे पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, तालुकाध्यक्ष विद्याधर पवार, जिल्हा सरचिटणीस सुयोग धामापूरकर, जिल्हा सदस्या सौ. विजयश्री नांदोसकर, सदस्य बाळकृष्ण नांदोसकर, सुकळवाड माजी सरपंच वैशाली पाताडे यासह अन्य उपस्थित होते.
आपला समाज अजूनही विखुरलेला आहे, त्याला जवळ आणण्याचे काम आपण सर्वांनी करूया. २८ फेब्रुवारी रोजी आपल्या जिल्हा कार्यकारिणीला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा वर्धापनदिन प्रथमच मालवण येथे होणार आहे. यावेळी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यातही सर्व समाजबांधवांनी सहभाग घेऊन वर्धापनदिन यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी केले. अन्य मान्यवर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.