नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ४० वर्षीय महिलेची आई होण्याची इच्छा होती. आपला मुलगा उंच आणि गोरा व्हावा अशी तिची अपेक्षा होती. त्यासाठी तिने स्पर्म डोनर कडून स्पर्म घेतले. त्यानंतर तिने यशस्वी आयव्हीएफ उपचारदेखील केले आणि ती आई बनली. परंतु तिच्या त्या अपेक्षांचा भंग झाला, जेव्हा तिला तिच्या गर्भधारणेच्या अहवालावरून कळले की तिचे मूल बुटका आहे.
दरम्यान तिच्या मुलाला ‘ एकॉड्रोप्लासिया ‘ हा अनुवांशिक रोग आहे. या रोगात, हाडांची वाढ थांबते. या रोगात, विशेषत: मेंदूचा आकार मोठा असतो आणि बोटे लहान असतात. मुलाचा जन्म झाल्यानंतर डॉक्टरांनी त्या महिलेला सांगितले की, तिचे मूल ४ फूटांपेक्षा जास्त वाढू शकणार नाही. मुलाचा चेहरा आणि हात आकार देखील लहान राहील. यावरून ती महिला संतप्त झाली, तिने स्पर्म बँकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘कोणत्याही महिलेची माझ्यासारखी फसवणूक होऊ नये, यासाठी मी हे पाऊल उचलले, असल्याचे तिने म्हंटले आहे.
रुसमधील जिल्हा कोर्टाने ही स्पर्म बँक बंद करण्याचा आदेश दिला. त्याच वेळी, या स्पर्म बँकने आमचे स्पर्म डोनर ४६ सामान्य अनुवांशिक रोगांच्या तपासण्या करून पात्र होतात त्यामुळे सर्व शुक्राणू चांगल्या प्रतीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, असे आवश्यक नाही कि, स्पर्ममुळेच मुलगा बुटका जन्माला असेल ,असे डॉक्तरांनी सांगितले आहे.
Visit : bahujannama.com