मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लग्नाआधी वडील गेले लग्नानंतर पतीदेखील अर्ध्या संसारातूनच जग सोडून गेला. पदरात एक मुलगी आणि आईचा आधार आपल्या या छोट्याशा कुटुंबाचा गाडा ती चालवत होती मात्र जी आई तिच्यासाठी भक्कम आधार होती तिची आई अचानक आजारी पडली आणि आईला जगवण्यासाठी कल्याणमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय शीतल कांबळे-चव्हाण यांचा संघर्ष सुरु झाला. पहाटे ५ ते ११ रिक्षा चालवणं आणि त्यानंतर पार्ट टाईम नोकरी करून शीतल परिस्थितीशी दोन हात करत होती. मात्र तरीही तिचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे त्यांनी समाजाकडे मदतीचं आवाहन केलं आहे.
शीतल कांबळे-चव्हाण यांची आई शीला कांबळे यांना अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम आहे. २ महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील फिनिक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईशिवाय जगण्याचा दुसरा कुठलाही आधार नाही. आईची प्रकृती खूपच बिघडली. वैद्यकीय चाचणी अहवालात तिला स्वाईन फ्लू झाल्याचं निदान झालं. त्यानुसार तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्यानंतर तिला न्युमोनियादेखील झाला. तिच्या यकृत आणि किडनीला सूज आली होती.
मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आईचं प्राण वाचले” रुग्णालयाचं बिल तब्बल साडेसहा लाख रुपये झालं आहे. रुग्णालय प्रशासनानं शक्य तितकी मदत केली. मात्र तरीदेखील पैशांची कमतरता आहेच. त्यामुळे सकाळी रिक्षा आणि दुपारनंतर पार्ट टाईम नोकरी करण्याचा निर्णय शीतल यांनी घेतला. त्यामुळे आईच्या उपचारांसाठी मदत करण्याचं आवाहन शीतल यांनी केलं आहे.
Visit : bahujannama.com