बहुजननामा ऑनलाइन टीम – माजी भारतीय कर्णधार आणि विकेट कीपर – फलंदाज एमएस धोनीची पत्नी साक्षीने दोन दिवसांपूर्वीच आपला 32वा वाढदिवस साजरा केला. तिने पती आणि मुलगी जीवासोबत दुबईत आपल्या खास दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जीवाने भरपूर मस्ती केली आणि धोनीच्या मुलीचा( news of Jeeva’s birth) हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरलसुद्धा होत आहे. सर्वांना महीत आहे की, माही आणि जीवा एकमेकांच्या खूप जवळ आहेत. स्वत: साक्षीनेसुद्धा मान्य केले होते की, जीवाला दहा वेळा सांगितले तरी ती तिचे ऐकत नाही, पण माहीने एक वेळ सांगताच ती ते काम करते.
जीवाचा जन्म 6 फेब्रुवारी 2015 ला झाला होता आणि त्यावेळी धोनी ऑस्ट्रेलिया दौर्यावर होता. 30 जोनवारीपासून सुरू झालेल्या ट्राय सीरिजनंतर टीम इंडियाला 15 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विरोधात आपल्या वर्ल्ड कप अभियानाची सुरुवात करायची होती. अशावेळी धोनीवर खूप मोठी जबाबदारी होती. धोनी मुलीच्या जन्माच्या वेळी भारतात नव्हता, कारण त्याचे म्हणणे होते की तो नॅशनल ड्यूटीवर आहे. यासाठी सर्व गोष्टी वाट पाहू शकतात.
खूप कमी लोकांना माहीत आहे की, साक्षीने जीवाच्या जन्माची बातमी सर्वप्रथम धोनीला न देता सुरेश रैनाला दिली होती. कारण वर्ल्ड कप लक्षात घेता धोनी सरावादरम्यान आपल्या जवळ फोन ठेवत नव्हता. याच कारणामुळे साक्षीने ही बातमी सर्वप्रथम रैनाला दिली आणि रैनाने ही खूश खबर धोनीपर्यंत पोहाेचवली.
लॉकडाउनच्या दरम्यान चेन्नई सुपर किंग्जसोबत इंस्टाग्राम लाइव्हवर चर्चेत साक्षीने खुलासा केला होता की, जीवा अगोदरपासून प्लॅन मुलाप्रमाणे होती. हे सर्वकाही वर्ल्ड कपदरम्यान झाले आणि धोनी परत येण्याचा प्रश्नच नव्हता. हॉस्पिटलमध्ये प्रत्येकजण म्हणत होता की, तुमचे पती अजून का आले नाहीत. पण मी ठीक होते. क्रिकेट त्यांची प्राथमिकता आहे आणि ते माझी.