मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भरगोस मतं मिळवत विजय खेचून आणलेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेलाही स्थान मिळालं आहे. पण आता माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.ते म्हणाले कि, ‘जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार, यालाच म्हणतात उद्धव ठाकरे,’ अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून खासदार निलेश राणे यांनी ही टीका केली आहे तर दुसरीकडे, आमदार नितेश राणे यांनीही शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘सर्व निवडणुका मोदींच्या नावावर लढण्यापेक्षा शिवसेना हा पक्षच भाजपमध्ये विलीन करा,’ असा टोला नितेश यांनी लगावला आहे.
निलेश राणे यांच्या टीकेला शिवसेनेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी राणे कुटुंबाला धूळ चारली आहे. त्यामुळेच हताश झालेल्या निलेश राणेंनी अशी खालच्या पातळीवरील टीका केली,’ असा पलटवार शिवसेनेनं केला आहे.
जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार… यालाच म्हणतात उद्धव ठाकरे. https://t.co/kUP8BOgWPs
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 30, 2019