नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील अनेक दिवसांपासून व्हाट्सपचे डिजिटल पेमेंट फिचर प्रलंबित आहे. काही रिपोर्टनुसार व्हाट्सअप पॅरेन्ट कंपनी फेसबुकला नॅशनल पेमेंट कोर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली असून आता लवकरच अधिकृतरित्या व्हाट्सअप पे भारतात लाँच होणार आहे.
दोन वर्षांपासून या फीचरचे टेस्टिंग सुरु असून एनपीसीआयने व्हॅट्सऍपला भारतामधील डिजिटल पेमेंट सर्व्हिस लायसन्सला परवानगी दिली आहे. डेटा लोकलायजेशनवरून व्हाट्सअपला परवाना मिळण्यास अडचणी येत असून कंपनीने मात्र हे निश्चित केले आहे की, व्हाट्सअप लोकल डेटा रेग्युलेशन फॉलो करेल.
सुरुवातीला हे पेमेंट फिचर १ कोटी युजर्ससाठी सुरु करणार असून भारतात व्हाट्सअप युजर्ससची संख्या जास्त आहे. ‘व्हाट्सअप पे’मुळे ‘पेटीएम’शी स्पर्धा होणार असून त्यामुळे ‘पेटीएम’चे सीईओ सतत ‘व्हाट्सप पे’वर टीका करत आहेत. ‘पेटीएम’चे संस्थापक विजय शेखर यांच्या म्हणण्यानुसार व्हाट्सअपला कोणतेही लॉग इन सिस्टम नसून ते सुरक्षित नसेल.