मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईमध्ये घाटकोपर येथे स्थानकावर एका वृद्ध व्यक्तीचा जीव जीआरपी जवानामुळे वाचला आहे. दरम्यान स्टेशनवर उपस्थित असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला छातीत वेदना होऊ लागला. पण जवानाने त्या व्यक्तीला खांद्यावर उचलून नेऊन स्टेशनच्या बाहेर नेले आणि त्याला योग्य वेळी रुग्णालयात दाखल केले गेले. आणि आता प्रत्येकजण जीआरपी जवानाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
प्रकाश गच्छे हे दुपारी अडीचच्या सुमाराला मुंबईतील घाटकोपर येथील स्थानकावरून जात असताना अचानकच त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या आणि ते स्टेशनवरच पडले. प्रकाश पडताच तेथे गर्दी झाली आणि त्या दरम्यान ड्युटीवर असलेले रेल्वे पोलिस कर्मचारी धनंजय गवळी तेथे पोहोचले. धनंजय यांना प्रकाश यांच्या छातीत दुखत असल्याचे समजताच त्याने कशाचीही वाट न पाहता प्रकाश यांना आपल्या खांद्यावर उचलून बाहेर नेले, अशी माहिती मिळत आहे.
मुंबई के घाटकोपर स्टेशन पर जीआरपी के इस जवान की मुस्तैदी की वजह से एक बुजुर्ग की जान बच गई. pic.twitter.com/uAiIPKLpSO
— Saad Bin Omer (@optimistomer) February 8, 2020
जवानाला अशाप्रकारे वृद्ध व्यक्तीस घेऊन पळताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. धनंजयने प्रकाश यांना राजावाडी रुग्णालयात नेऊन आयसीयूमध्ये दाखल केले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश यांच्या तब्येतीत आता सुधारणा झाली असून जवानाने समजूतदारपणा दाखवून ज्येष्ठांचे प्राण वाचविले, याबद्दल अनेकजण त्यांचे कौतुक करीत आहे.