बहुजननामा ऑनलाइन टीम : सध्या मोबाईलमधील जास्तीत जास्त वापरण्यात येणारा अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. या अॅपचा वापर सर्व वयोगतील व्यक्ती करतात. हा अॅप वापरताना सर्वांना प्रतिक्षा होती ती म्हणजे डार्क मोड फिचरची. हे अॅप आता रोलआऊट करण्यात सुरुवात झाली आहे. 2020 मध्ये, कंपनी काही नवीन वैशिष्ट्ये आणण्याच्या तयारीत आहे जी व्हॉट्सअॅप वापरण्याचा अनुभव बदलून टाकेल. यातले सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे डार्क मोड.
हे फीचर सध्या काही मोजक्या यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अँड्राइंड बीटा व्हर्जनसाठी काही दिवसांपूर्वी हे फीचर कंपनीकडून उपलब्ध करुन देण्यात आले होते. सर्व यूजर्सला हे फीचर उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कंपनी टेस्ट करत आहे. यात काही त्रुटी आढळल्यास त्या तात्काळ दुरुस्त करण्यात येतील. कंपनी हे खास फीचर यूजर्सच्या डोळ्यावर स्क्रीनमुळे येणार ताण कमी करण्यासाठी आणत आहे. रात्री पांढऱ्या प्रकाशाने मोबाइल वापरताना यूजर्सला त्रास होत होता. डार्कमोड हे खास फीचर सर्व यूजर्सपर्यंत पोहचवण्यासाठी आता व्हॉट्सअॅप जोरदार तयारीला लागले आहे. या डार्कमोड फिचर्समुळे युजर्सला खूप फायदा होणार आहे.
WhatsApp चे अपडेट देणाऱ्या WABetaInfo कडून सांगण्यात आले की, डार्कमोड चे हे फीचर सर्व यूजर्सपर्यंत पोहचवण्याची तयारी सुरु झाली आहे. कॅमेरातून काढण्यात आलेले फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर करताना यूजर्सला डार्कमोडचे फीचर दिसत आहे. परंतु असे असले तरी हे फीचर सर्वांना कधीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल याची माहिती देण्यात आलेली नाही. iOS यूजर्सला या फीचरसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. iOS साठी डार्कमोड फीटर हळूहळू अंमलात येईल, सध्या हे डेव्हलप करण्याचे काम वेगाने सुरु आहे. iOS वरील डार्कमोड सुधारण्याची आवश्यकता आहे असे ही WABetaInfo ने सांगितले आहे.
Visit : bahujannama.com