बहुजननामा ऑनलाईन – WhatsApp चा वापर आज काल प्रत्येक जण सहज रित्या करतो. सगळ्यात महत्त्वाच्या अॅप मध्ये व्हाट्सअँपचा समावेश हा असतोच. कित्येक वर्षांपासून आपण व्हाट्सअँप वापरत आहोत . अशाच या व्हाट्सअँप मधील काही साध्या आणि महत्त्वाच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊ. हे फीचर्स सध्या ट्रिक्स वापरून व्हाट्सअँप मधील अनेक काम तुम्ही पूर्ण करू शकता. जाणून घेऊ व्हाट्सअँप मधील पाच सिम्पल ट्रिक्स
Status Hide – जर तुम्हाला तुम्ही ठेवलेला स्टेटस काही लोकांना दाखवायचा नसेल केवळ मोजक्या लोकांसाठी तुम्हाला स्टेटस ठेवायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता. यासाठी सर्व प्रथम स्टेटसवर जावा तिथे उजव्या बाजूला तुम्हाला Status Privacy असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर My contacts, My contacts except आणि Only share with असे तीन पर्याय दिसेल. त्यामध्ये ‘My contacts except’ या पर्यायावर क्लिक करून सिलेक्ट करा यानंतर त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट वर क्लीक करून त्यांच्या पासून तुमचा स्टेटस लपवू शकता.
Mute Group Chat – जर तुम्ही खूप साऱ्या ग्रुप मध्ये असाल आणि त्यावर येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे वैतागले तर काळजी करू नका या फीचरच्या मदतीने तुम्ही नोटिफिकेशन बंद करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Group Info वर जावं लागणार. त्यानंतर Mute Chat ऑप्शनला निवडा. यामध्ये तुम्ही ८ तासापासून ते १ वर्षापर्यंत ग्रुप मधील नोटिफिकेशन बंद करू शकता.
Disable Blue Tick – हे फिजर्स युजर्सच्या प्रायव्हसीला लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. या फीचरमुळे तुम्ही पाठवलेले संदेश किंवा तुम्हाला आलेले संदेश हे वाचले गेले की नाही हे समजणार नाही. यासाठी सर्वप्रथम सेटिंग मध्ये जावा. यामध्ये अकाउंट वर क्लीक केल्यावर तुम्हाला प्रायव्हसी पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Read Receipt हा पर्याया निवडा आणि त्याला Disable करा. यानंतर कोणालाही समजणार नाही की तुम्ही संदेश वाचला आहे की नाही.
Hide Last scene – जर तुम्हाला हे लपवायचे असेल की तुम्ही कधी ऑनलाईन आलात आणि कधी शेवट ऑनलाईन होतात यासाठी हा फिचर उपयोगी येईल. यासाठी सर्वप्रथम सेटिंग मध्ये जाऊन Account या पर्यायावर क्लीक करा. यानंतर तुम्हाला Last seen असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि Nobody हा पर्याय निवड. असे केल्याने कोणालाही कळणार नाही कि तुम्ही शेवट कधी ऑनलाईन होतात.
Share Live Location – तुम्ही कुठे अडकला असाल किंवा तुम्ही कुठे आहे हे कोणाला सांगायचे असेल तर त्यासाठी हा फिचर खूप उपयोगी येणार आहे. यासाठी तुम्हाला सर्व प्रथम चॅट बॉक्सच्या अटैचमेंट मध्ये जावा. तिथे शेअर लोकेशन या पर्यायाला निवडा आणि यावरून तुम्ही लोकेशन पाठवू शकता. तुम्ही लाइव्ह लोकेशन १५ मिनिट, १ तास ते ८ तासापर्यंत शेअर करू शकता.