मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- एका महिलेने क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी स्वतःची दोन जुळी मुले विकली. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, चीनच्या झेजियांगच्या सिक्सी येथे राहणार्या महिलेचे क्रेडिट कार्ड बिल ६ लाख ५६ हजार रुपये होते. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. महिलेच्या मुलांचा जन्म होऊन २ आठवडे देखील झाले नव्हते आणि तिने त्यांना दोन वेगवेगळ्या कुटुंबांना विकले. मुले खरेदी करणारे लोक त्या महिलेच्या घरापासून सुमारे ७०० किमी अंतरावर राहणारे होते. शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी प्रकरण उघडकीस आणले.
चीनच्या नवीन कायद्यानुसार बाल तस्करीमध्ये सामील असलेल्या लोकांना १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. मुलांना विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून या महिलेने नवीन फोनही विकत घेतला. मुलांना वाचवून महिलेच्या पालकांना देण्यात आले आहे. या महिलेला आणि तिच्या जोडीदारास पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचे वय २० ते ३० वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सप्टेंबरमध्ये प्रीमैच्योर जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
त्यानंतर तिचा साथीदार देखील रुग्णालयात आला नाही आणि पार्टनरच्या घरातील देखील तिच्या मदतीसाठी आले नाहीत. त्यानंतर त्या महिलेला मुलांचे ओझे वाटायला लागले. या महिलेने एका मुलाला साडेचार लाखांना विकले तर दुसर्या मुलाला २ लाखांना विकले. त्यानंतर या महिलेचा जोडीदाराही या पैशामध्ये वाटा मागू लागला. महिलेने सांगितले की हा पैसा खर्च झाला आहे. एक ओळख म्हणून, महिलेचे आडनाव ‘मा’ असे वर्णन केले आहे, तर तिच्या जोडीदाराचे आडनाव ‘वू’ आहे.